Saturday, November 08, 2008

नियती

सळसळणाऱ्या अंधाराला घाबरून,
तु जगणच दिलयस सोडून..
जरा कोश तोड..
पट्टी सोड
डोळ्यावरची..
धबधब्यासारखं आयुष्य हसेल..
तुलाही दिसेल..
कि श्वास कोंडेपर्यंत बुडी मारण्यातही
वेगळाच आनंद..
वाहणच बंद..
करून नाही चालत,
वाट शोधावीच लागते,
नियतीला विरोध करुन,
जरी ती तिच्या मनासारखीच वागते...

Wednesday, June 28, 2006

पहिला पाउस.. पहिली आठवण..

पहिला पाउस.. पहिली आठवण..

पहिलं घरट.. पहिलं अंगण..

पहिली माती.. पहिला गंध…

पहिल्या मनात… पहिलाच बंध…

पहिलं आभाळ... पहिलं रान…

पहिल्या झोळीत… पहिलच पान..

पहिले तळहात… पहिलं प्रेम..

पहिल्या सरीचा .. पहिलाच थेंब.

पहिला पाउस.. पहिली आठवण..


Saturday, June 24, 2006
















आले रडू तरीहि..

आले रडू तरीहि.. कोणी रडू नये..

कोणीच आसवांच्या हाती पडू नये..

व्हावे निरभ्र सर्व सांगून एकदा..

कोणी असे स्मितांच्या मागे दडू नये..!!!




तु भेटलीस तेंव्हा ..

तु भेटलीस तेंव्हा .. मी बोललोच नाही..

तु भेटतेस तेंव्हा.. माझे असेच होते…

झाला ऊशीर जेंव्हा.. हाका तुला दिल्या मी..

मातीत पावलांचे.. काही ठसेच होते…