Sunday, August 15, 2021

ती सध्या काय करते

 शेवटी  एकदा धीर करून

शोधली तिला Facebook वरून

वेगळीच दिसते आता थोडी

वयानुसार वाढलीय जाडी

पण गालावरची  खळी तशीचए 

नजर जरा वेंधळी तशीचए

हसताना दिसतेय तितकीच छान

फोटोत तीच तिरकी मान

पण background बदललंय

स्टँडर्ड वाढलंय

ऑफिस पार्टी, weekend trips

काही solo, काही groups

काही गोजिरे family shots

मग मात्र मी phone करतो off

तू पण शोधालस का ग मला ?

येते का आठवण कधी तुला

मनात उगाच खड्डा पडतो

उरलेला week असाच सरतो 

संडेला facebook केलं ओपन

पेंडिंग one notification

manatla khadda ala भरून 

तुझी friend request बघून!!

तुझी friend request बघून!!


Tuesday, September 03, 2013

Happy Birthday!!

चौतीस ची तू झालीस आता
वर सिफ़र ची आई
पण तशीच आहेस निश अजून
काही फरक नाही
आठवतात का गच्चीवरचे
भातूकलीचे खेळ?
भाजी आणण्यातच गेला
माझा सगळा वेळ
दिवाळीच्या पहाटेला
फटाक्यांचे वाटप
तू काडी ओढल्यावर
पुढे झालेले नाटक
चल पुन्हा गच्चीवर
भातुकली मांडू
परत एकदा रिमोटवरुन
ज़ोरदार भांडू
ओवाळणीचे दिवस सोडून
पण आठवण काढत जा
एक नंबर आहेस निशू
आहे तशीच रहा़़़..

Friday, June 08, 2012

एक उनाड दिवस



एक उनाड दिवस

थोडासा हवाय change
सगळच झालंय strange
office चा stress... formal dress
नको वाटतो आजकाल
नकोच वाटतेय even ती facebook ची वॉल!
बास उद्विग्न होण कोणी थुंकल कि रस्त्यावर
उगाच खोट हसण कोणी उसन हसल्यावर
डोक्यातल्या विचारांनीही घ्यावा break थोडा
त्यांना म्हणावं कधीतरी मला एकट सोडा 
नका कोणी वाट पाहू एक दिवस घरी 
राहील का मन blank एक दिवस तरी?
mould मधल्या जगण्यातला संपत चाललाय रस
चेंज म्हणून मिळेल का  "एक उनाड दिवस"?

Wednesday, December 21, 2011

डोळे



भीती वाटते तुझ्या

आसुसल्या डोळ्यांची

दररोज संध्याकाळी
वाट पाहणाऱ्या..

त्यांना नजरही देऊ शकत नाहीत
माझ्या झुकलेल्या पापण्या,
पण उत्तर मिळून जातं..

तुझे पाणीदार डोळे बनतात आणखीनच पाणीदार ...
पण क्षणात पाणी निपटून
तेच डोळे देतात
मला आश्वासक धीर,
आणि पुन्हा लकाकतात उद्याच्या सुखस्वप्नांनी...

दुसऱ्या दिवशी पुन्हा
मी माझे डोळे घेऊन निघतो,
"No vacancy" च्या पाट्या बघायला....

Monday, December 19, 2011

पाऊस


निघालो ना आज office मधून

तेंव्हा पाऊस आला होता

मनात भावनांचा नुसता चिखल झाला होता

गडगड वाजत होते दाटून आलेले ढग

उगाच शांत वाटत होत तरीही सगळ जग

रस्ता एवढा स्वच्च आधी कधी दिसला होता?

वळचणीला पंख वाळवत एक पारवा बसला होता

थेंब न थेंब म्हणत होता ये ना पावसात भीज

घरात नाही पण आभाळात चमकत होती वीज

सोसाट्याच्या वाऱ्यासोबत झाड डोलत होती

रस्त्यावरती लहान मुल गारा झेलत होती ..

रस्त्यावरून वाहत होते chocolaty पाण्याचे लोट

आतून सुद्धा भिजला होता माझा raincoat

भिजलेल्या मातीचा मस्त वास पसरला होता

चीत्कारणारा चातक त्याच भान विसरला होता

वाटल आता ओरडशील का भिजलास रवि

सकाळीच म्हणाल होत आज गाडी न्यायला हवी

पण तुही उघडल्स दार चक्क आज हसत

पाहिलं तर तुही होतीस ओले केस पुसत !