Wednesday, February 09, 2011


चालणं

नेहमिच आवडतं मला
लांब चालत जायला..
तुझ्या हातामध्ये
हात गुंफून घ्यायला..

खूप पुढे जावसं वाटूनही
तुझी साथ द्यायला..

तु उत्सुक नजरेने सगळीकडे पाहताना
तुझ्याकडे पहायला..

वाटेल जेंव्हा अडखळशील
तेंव्हा सावरायला..

मनात घोळवलेली ती धून
तुझ्या सोबत गायला..

विसरून मग स्वतःला
फक्त तुझा ऊरायला..

No comments: