डोळे

भीती वाटते तुझ्या
आसुसल्या डोळ्यांची
दररोज संध्याकाळी
वाट पाहणाऱ्या..
त्यांना नजरही देऊ शकत नाहीत
माझ्या झुकलेल्या पापण्या,
पण उत्तर मिळून जातं..
तुझे पाणीदार डोळे बनतात आणखीनच पाणीदार ...
पण क्षणात पाणी निपटून
तेच डोळे देतात
मला आश्वासक धीर,
आणि पुन्हा लकाकतात उद्याच्या सुखस्वप्नांनी...
दुसऱ्या दिवशी पुन्हा
मी माझे डोळे घेऊन निघतो,
"No vacancy" च्या पाट्या बघायला....
No comments:
Post a Comment