Monday, April 19, 2010

चकवा



फिरत राहतो वारा आणि वाजू लागतात ढग
आतुरलेल मन पावसाची वाट पाहत मग..!!

चमकून जाते वीज येतो मातीलाही वास
वाटत अगदी मनासारखा पाउस येणार आज..!!

काळ्या ढगांमध्ये सूर्य अंग चोरून घेतो
धगधगलेल्या दुपारनंतर सांजगारवा येतो..!!

मोठ मन म्हणत आज बहुतेक लाईट जाणार
लहान मन म्हणत "आई पाउस कधी येणार?"..!!

नाहीच येणार बहुदा याचा नाही काही नेम
तेवढ्यात पडतात अंगावरती कुठून दोन थेंब..!!

आसुसलेल वेड मन जात आनंदून
वाटत आता भिजून घ्याव पावसात भरभरून..!!

पण पहिले चार थेंब शेवटचेच होतात
आणि मग उरलेले डोळ्यामध्ये येतात..!!

क्षणामध्ये जाणवतो जन्मभराचा थकवा
पावसाने दिलेला असतो पुन्हा एकदा चकवा ..!!

No comments: