Friday, April 23, 2010

पाऊस कोसळू दे




पाऊस कोसळू दे
उल्हास वर्दळू दे

मातीतुनी नभाला
रुजवून सळसळू दे

नुसते अता स्मितांनी
भवताल झळझळू दे

बोलू नकोस काही
एकांत दर्वळू दे

मज ओंजळीत घे, पण
थोडे उचंबळू दे!

जे बोललोच नाही,
तेही तुला कळू दे‍!

मी काय, कोण आहे?
मजलाच आकळू दे

--चित्तरंजन

No comments: