Monday, December 19, 2011

पाऊस


निघालो ना आज office मधून

तेंव्हा पाऊस आला होता

मनात भावनांचा नुसता चिखल झाला होता

गडगड वाजत होते दाटून आलेले ढग

उगाच शांत वाटत होत तरीही सगळ जग

रस्ता एवढा स्वच्च आधी कधी दिसला होता?

वळचणीला पंख वाळवत एक पारवा बसला होता

थेंब न थेंब म्हणत होता ये ना पावसात भीज

घरात नाही पण आभाळात चमकत होती वीज

सोसाट्याच्या वाऱ्यासोबत झाड डोलत होती

रस्त्यावरती लहान मुल गारा झेलत होती ..

रस्त्यावरून वाहत होते chocolaty पाण्याचे लोट

आतून सुद्धा भिजला होता माझा raincoat

भिजलेल्या मातीचा मस्त वास पसरला होता

चीत्कारणारा चातक त्याच भान विसरला होता

वाटल आता ओरडशील का भिजलास रवि

सकाळीच म्हणाल होत आज गाडी न्यायला हवी

पण तुही उघडल्स दार चक्क आज हसत

पाहिलं तर तुही होतीस ओले केस पुसत !

No comments: