Friday, June 08, 2012
एक उनाड दिवस
Wednesday, December 21, 2011
डोळे

भीती वाटते तुझ्या
आसुसल्या डोळ्यांची
दररोज संध्याकाळी
वाट पाहणाऱ्या..
त्यांना नजरही देऊ शकत नाहीत
माझ्या झुकलेल्या पापण्या,
पण उत्तर मिळून जातं..
तुझे पाणीदार डोळे बनतात आणखीनच पाणीदार ...
पण क्षणात पाणी निपटून
तेच डोळे देतात
मला आश्वासक धीर,
आणि पुन्हा लकाकतात उद्याच्या सुखस्वप्नांनी...
दुसऱ्या दिवशी पुन्हा
मी माझे डोळे घेऊन निघतो,
"No vacancy" च्या पाट्या बघायला....
Monday, December 19, 2011
पाऊस
निघालो ना आज office मधून
तेंव्हा पाऊस आला होता
मनात भावनांचा नुसता चिखल झाला होता
गडगड वाजत होते दाटून आलेले ढग
उगाच शांत वाटत होत तरीही सगळ जग
रस्ता एवढा स्वच्च आधी कधी दिसला होता?
वळचणीला पंख वाळवत एक पारवा बसला होता
थेंब न थेंब म्हणत होता ये ना पावसात भीज
घरात नाही पण आभाळात चमकत होती वीज
सोसाट्याच्या वाऱ्यासोबत झाड डोलत होती
रस्त्यावरती लहान मुल गारा झेलत होती ..
रस्त्यावरून वाहत होते chocolaty पाण्याचे लोट
आतून सुद्धा भिजला होता माझा raincoat
भिजलेल्या मातीचा मस्त वास पसरला होता
चीत्कारणारा चातक त्याच भान विसरला होता
वाटल आता ओरडशील का भिजलास रवि
सकाळीच म्हणाल होत आज गाडी न्यायला हवी
पण तुही उघडल्स दार चक्क आज हसत
पाहिलं तर तुही होतीस ओले केस पुसत !
Wednesday, December 14, 2011
इतकी घट्ट झालीय हि रेशीम गाठ
हे बोलाल तर रुसशील , हे बोललं तर हसशील
काय बोललं तर खुलाशील ., याला गप्प बसशील
सगळ आधीच कळत आजकाल
कोणत्या गोष्टीवर फुगवशील गाल ..
आधीच कळत तुला हवीय मिठी
सगळ बोलून जाते दिठी ..
न कळल्स करेल सगळ कळून ..
आत्ता बघेल मग वळून ..
आत्ता बसेल सावरून ताठ
तुझे सगळे responce आता झालेत पाठ
नात्याचं ह्या झालाय वय
तुझ्या असण्याची इतकी सवय ..
कि कधीकधी I take you for granted.
something that you never wanted
सांगीतालेलास मला पूर्वी कधीतरी
सांगतानाचा अविर्भाव आठवतोय .. date आठवत नसली तरी .
आठवतंय हे सगळ कारण तू नाहीस जवळ
enjoy करतानाही मनात येते बारीक कळ
विचार केला असतो तू नसताना दंगा घालू ..
पण तू "मी येते " म्हणालीस कि होत वाट बघण चालू ..
mattini चा picture , खडकवासल्याचा view
but Nothing's the same without you
जसे जातील दिवस आणि वर्ष जातील सरत .
लोणच्या सारखं नात राणी मस्त जाईल मुरत
खर सांगू नात हे कधी होत नाही जून
गंजत नाही कधी हे 100 नंबरी सोन
Tuesday, June 14, 2011
गर्दी..
ओळखीच्यांची गर्दी झालीय ....मित्र शोधतोय सध्या ...
कधी काळी तिला लिहलेल पत्र शोधतोय सध्या ..
सगळे "मित्र" सोय पाहतात मीही ............ कदाचित तसाच
माझ्याच स्वतःशी तुटलेल्या मैत्रीचे गुंते सोडवातोय सध्या ..
तिचं हसण, रुसन जवळ बसण
कायम असण समोर आणि आतही कुठेतरी
समोर नाही ती तर आतल्या तिच्याशी
बोलून घेतोय सध्या ..
खूप खाल्लं आता जरा रेस्ट घ्यावी म्हणतो
नाहीतरी उपासाची fasion आलीय सध्या ..
गुणगुणून पाहिलं शुभं करोति काल जरा मी
बालांच्याही तोंडी मुन्नी शीला आहे सध्या .
उगाच घोकल्या सनावळ्या अन तहाची कलमे
म्हणे नव्याने परत सगळा इतिहास लिहितायत सध्या
धरला होतास हात ज्याचा मम म्हणुनी
त्या स्वतःचा पुन्हा एकदा शोध घेतोय सध्या ..
Tuesday, May 17, 2011
आताशा मी कोणाशीच attach होत नाही..
कोणाशीच wavelength माझी match होत नाही..
कोणी हसून बोललं तर मीही तोंडभर हसतो..
बोलायलाच पाहिजेत म्हणून 2 वाक्य बोलतो..
innocent प्रेमाची आता भीतीच वाटते जरा,
मैत्री बित्री प्रकार फक्त facebook वरच बरा
विचारलाच कुणी तर म्हणायचं "I am fine"
नकोच वाटल बोलायला तर जायचं offline.
मन आता घेत नाही कोणाकडे धाव..
राहत फक्त कुरवाळत चिघळलेले घाव.
संपलेत मित्र राहिलीयत फक्त professional नाती,
सांभाळायची just weekend मजेत घालवण्यासाठी..
मन झालाय प्लास्टिक आता होत नाही ओलं
कळलंच नाही कधी आपल्याच कोशामध्ये गेल?
मित्रांचेही फोन आता सोयीनुसार घेतो..
पत्ता विचारलाच कोणी तर ...... facebook id देतो!
Wednesday, February 09, 2011
संध्याकाळची bus हल्ली मी चुकवत नाही
६ नंतर office मध्ये थांबवतच नाही
तुही असतेसच कि तिथे पावणे सहा पासून
स्वागत करतेस माझ मग डोळ्यानीच हसून
सगळे रोजचेच चेहरे तिथे पण एकाच चेहरा खास ..
ठरवतो रोजच्या सारखाच परत विचारून टाकायचं आज
ती पुढे मी मागे मध्ये चार जणांची रांग
डोळ्यामधून लागत नाही तिच्या मनाचा थांग
सगळे वाट पाहत असतात बस कधी येईल ..पण
मला वाटत गोठून जावा इथेच हा सुंदर क्षण
खळखळणार हसू आणि वाऱ्यावर उडणारे केस ..
हृदय माझ खेळू लागत formula 1 race...
बस 2 मिनिट लवकरच येते आणि लगेचच तिचा stop
परत एकदा प्लान माझा super duper flop..
मी पाहतो खिडकी बाहेर तीही पाहते वळून ..
उत्तर मला मिळून जात तिच्या डोळ्यां मधून !
Wednesday, January 12, 2011
Friday, April 23, 2010

पाऊस कोसळू दे
उल्हास वर्दळू दे
मातीतुनी नभाला
रुजवून सळसळू दे
नुसते अता स्मितांनी
भवताल झळझळू दे
बोलू नकोस काही
एकांत दर्वळू दे
मज ओंजळीत घे, पण
थोडे उचंबळू दे!
जे बोललोच नाही,
तेही तुला कळू दे!
मी काय, कोण आहे?
मजलाच आकळू दे
Monday, April 19, 2010

फिरत राहतो वारा आणि वाजू लागतात ढग
आतुरलेल मन पावसाची वाट पाहत मग..!!
चमकून जाते वीज येतो मातीलाही वास
वाटत अगदी मनासारखा पाउस येणार आज..!!
काळ्या ढगांमध्ये सूर्य अंग चोरून घेतो
धगधगलेल्या दुपारनंतर सांजगारवा येतो..!!
मोठ मन म्हणत आज बहुतेक लाईट जाणार
लहान मन म्हणत "आई पाउस कधी येणार?"..!!
नाहीच येणार बहुदा याचा नाही काही नेम
तेवढ्यात पडतात अंगावरती कुठून दोन थेंब..!!
आसुसलेल वेड मन जात आनंदून
वाटत आता भिजून घ्याव पावसात भरभरून..!!
पण पहिले चार थेंब शेवटचेच होतात
आणि मग उरलेले डोळ्यामध्ये येतात..!!
क्षणामध्ये जाणवतो जन्मभराचा थकवा
पावसाने दिलेला असतो पुन्हा एकदा चकवा ..!!
Friday, April 16, 2010
I opened the technical book which I wanted to read, but thought why not go through the fowards in my mailbox which I had igonred. So after 4 hours, 4 tweets, inbox with 0 unread mails I manage to complete a 3 page chapter from 1059 page book. And I am aware of latest new, sports gossip, movie reviews and tech stuff cause I have browsed through each and every link from twitter posts or blogs I have come across.
4 gone 4 to kill!!!







